जिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचा विळखा

उपचारासाठी खासगी अथवा मुंबई जाण्याची वेळ

| अलिबाग | प्रमोद जाधव |

जीर्ण झालेली इमारत, परिसरात घाणीचे साम्राज्य, पार्कींगचा अभाव अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णालयात विशेष डॉक्टर नसल्याचा फटका रुग्णांच्या सेवेवर होत आहे. त्यात पूर्णवेळ परिचारिकांचा अभाव निर्माण झाला आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सांपासून विशेष डॉक्टर व परिचारिकांची 78 पदे भरण्यास प्रशासन उदासीन ठरला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय 1980-1981 या कालावधीत उभारले. तीन मजली असलेल्या इमारतीमध्ये 250 खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात दर दिवशी सुमारे 800 पेक्षा अधिक रुग्ण बाह्य रुग्ण कक्षामध्ये उपचारासाठी येतात. पोलादपूरच्या टोकापासून पनवेल, उरण अशा अनेक तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील रुग्ण अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. चांगली सेवा मिळेल या आशेने येणाऱ्या रुग्णांची रुग्णालयात आल्यावर घोर निराशा होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तज्ञ डॉक्टर नसल्याचे सांगून तेथील कर्मचारी अधिक उपचारासाठी खासगी अथवा मुंबईमधील दवाखान्यात पाठवितात. या प्रकारामुळे सर्वसामान्य रुग्णांची अनेकवेळा परवडत होत आहे.

जिल्हा सामान्या रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून तज्ञ डॉक्टरांसह नियमीत परिचारिकांची भरती न केल्याने कंत्राटी डॉक्टर कंत्राटी परिचारीकांच्या भरोवश्यावर कारभार चालत आहे. जिल्हा रुग्णालयात वर्ग एकचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकिय अधिकारी, शस्त्रक्रीया, स्त्रिरोग, बालरोग, अस्थिव्यंग, बधिरीकरण, क्ष किरण, शरीर विकृती, मनोविकृती, चर्मरोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा यांचे वैद्यकिय अधिकारी, दंतशल्यचिकित्सकांसह मनोविकृती चिकित्सक अशी एकूण 18 पदे रिक्तआहेत. तसेच वर्ग दोनचे नेत्र शल्यचिकित्सक, बधिरीकरण तज्ञ, अस्थिव्यंग चिकित्सक, क्ष किरण शास्त्रज्ञ व वैद्यकिय अधिकारी, दंतशल्यचिकित्सकची सहा पदे रिक्तआहेत.

जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या अधिसेविका, आरोग्य परिचारिका, सिस्टर टयुटर, उपप्राचार्य, अधिपरिचारिका, शुश्रुषा अधिकारी, मनोविकृती परिचारिका यांची 47 पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. या रिक्त पदांचा रुग्णांच्या सेवेवर परिणाम होत आहे. तज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना त्या आजारावरील रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाही. शिकाऊ अथवा कंत्राटी डॉक्टरांच्या भरोवशावर रुग्णांना सेवा मिळत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.

रिक्त पदांवर दृष्टीक्षेप

पदेमंजूरभरलेलीरिक्त
तज्ञ डॉक्टर522824
अधिसेविका010001
अधिपरिचारिका967818
सिस्टर ट्युटर190415
Exit mobile version