फिटनेस ऑन जिम तक्का प्रथम
| पनवेल | प्रतिनिधी |
खांदेश्वर नवीन पनवेल पश्चिम येथे पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन, रायगडची पार पडली. आगरी शिक्षण संस्थाचे माध्यमिक विद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत अनेक नामवंत पुरुष व महिला खेळाडू आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन पॉवरलिफ्टिंग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गिरीश वेदक, महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग संघटनेचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित संजय सरदेसाई, सहसचिव छत्रपती पुरस्कार सन्मानित संजय माधव, मुंबई शहर संघटनेचे शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित अनंत चाळके, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित सतीश पाताडे, आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त रामचंद्र गावडे, सनदी लेखापाल राजाराम गोळे, पनवेल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंकज भगत यांच्या उपस्थितीत पार पडले. स्पर्धेसाठी पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सतीश पाताडे, राष्ट्रीय खेळाडू गोपीनाथ पवार, अंकुश सावंत, उत्तम धुरी, जितेंद्र यादव (सर्व,मुंबई), नवी मुंबईचे राकेश पाटीलआणि रामचंद्र गावडे (रायगड) यांनी काम केले.
या स्पर्धेत सब ज्युनिअर स्ट्राँगबॉय अद्वैत भोसले (कॉडझील्हा जिम महाड),ज्युनिअर मुले स्ट्राँग बॉय अथर्व लोधी (संसारे फिटनेस, पेण) सिनिअर पुरुष मध्ये नितीन बिरवाडकर (कॉडझील्हा जिम महाड), ओव्हरऑल मास्टर स्ट्राँगमन महेश पाटील (शिवतेज जिम, वावोशी – खोपोली) आणि महिलांमध्ये ओव्हर ऑल स्ट्राँगवूमन अमृता भगत (पॉवर हाऊस क्लब खोपोली) झाली. सांघिक विजेतेपद ओव्हर ऑल प्रथम क्रमांक (फिटनेस ऑन जिम तक्का पनवेल) द्वितीय क्रमांक क्वाडझिल्हा जिम, (महाड), तर तृतीय क्रमांक आयएनडी क्लब (कर्जत) यांना मिळाला.
