। सुकेळी । वार्ताहर ।
संकल्प मित्र मंडळ वांगणीतर्फे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन शनिवार (दि.21) रोजी करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी ग्रुप डान्स तसेच वैयक्तिक डान्स स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये ग्रुप डान्समध्ये स्टेप आर्ट डान्स अकॅडमी उरण यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर वैयक्तिक डान्समध्ये आर्या नारांगिकर हिने बाजी मारली.
या नृत्य स्पर्धेत ग्रुप डान्समध्ये स्टेप आर्ट डान्स अकॅडमी उरण यांनी प्रथम क्रमांक पटकावत संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या गावाचे नावलौकीक केले. तसेच द्वितीय क्रमांक यश भगत आणी ग्रुप व तृतीय क्रमांक एम डान्स अकॅडमी यांनी मिळविला.तर उत्तेजनार्थ केदार डान्स अकॅडमी व त्रिशा आणी ग्रुप यांनी मिळविला.
त्याचप्रमाणे वैयक्तिक डान्स स्पर्धेत आर्या नारांगिकर हिने बाजी मारली. तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे प्रियाली पाटील व वंशिता नाईक यांनी पटकावला तर उत्तेजनार्थ आरती मोरे व आस्था दळवी यांना देण्यात आला. या सर्वच विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक एकनाथ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प मित्र मंडळाचे चेतन दळवी, प्रविण कदम, सौरभ तेलंगे, मनिष तेलंगे, वामन तेलंगे, शुभम तेलंगे, साहिल तेलंगे, संतोष ठाकूर, प्रविण तेलंगे, नरेश चव्हाण, मंदार तेलंगे, नितीन तेलंगे, राकेश भिसे, मोहन तेलंगे, रोशन चव्हाण, सदानंद चव्हाण, हेमंत चव्हाण, ओमकार तेलंगे, राहुल चव्हाण, अक्षय ठाकूर यांनी मेहनत घेतली. यावेळी भाई टके, मयुर खैरे, संतोष कोळी, विनायक गोळे, तानाजी नारनवार, एकनाथ ठाकूर, बाळा टके, लहु तेलंगे, शेखर ठाकूर, मनोहर शिर्के, नरेश दळवी, कांचन ठाकूर , सचिन कळसकर, एकनाथ दळवी, भाऊ तेलंगे, बाळा भिसे, तेजल ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते.