जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ

। उरण । वार्ताहर ।

द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान उरण येथे जिल्हास्तरीय द्रोणागिरी फुटबॉल-2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन महादेव घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवेंद्र म्हात्रे, दिलीप तांडेल, महेंद्र सावंत, मणिराम पाटील, अनंत भगत, आत्माराम घरत, मंगेश घरत, यशवंत ठाकूर, सई पाटील, जगजीवन भोईर, नरेश म्हात्रे, डॉ. हंसराज जाधव, रेणूका साळुंके, डॉ. अश्‍विनी कोकरे व परिचारिका उपस्थित होत्या.

14 वर्षाखालील जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत 12 संघ व राज्यस्तरीय खुल्या गटात 16 संघ सहभागी झाले आहेत. फुटबॉल स्पर्धा तीन दिवस चालणार आहे.खोपोली, अलिबाग, नवी मुंबई, मुंबई इत्यादी ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले आहेत. फुटबॉल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख भरत म्हात्रे, किरण घरत, जयेश पाटील, सचिन पाटील, मुकेश घरत, प्रवीण घरत, प्रकाश भोईर, विजय पाटील, सुनीत घरत, दिवेश घरत,रविंद्र पाटील,आकाश पाटील, अ‍ॅड. मच्छिंद्र घरत, द्रोणागिरी स्पोर्टसचे क्रीडा प्रशिक्षक प्रविण तोगरे, राम चव्हाण, विजय पाटील, संजीव पाटील यांनी सहकार्य केले.

पारितोषिकचे वितरण रविवारी दि.14 संध्याकाळी 5 वाजता शिवराय चौक, नवीन शेवा बीपीसीएल रोड, उरण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी सकाळी 7.30 वाजता आयोजित केली असून या स्पर्धेत 4500 स्पर्धेकांची नोंदणी झाली आहे. या स्पर्धेला सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले.

Exit mobile version