जिल्हास्तरीय आंतरशालेय नेटबॉल स्पर्धा

ग्रेगोरियन पब्लिक स्कूलचे वर्चस्व

| खांब | प्रतिनिधी |

रायगड जिल्हास्तरीय आंतरशालेय नेटबॉल स्पर्धेत ग्रेगोरियन पब्लिक स्कूल, रोहा येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
सदरील स्पर्धेचे उद्घाटन ग्रेगोरियन पब्लिक स्कूल, रोहाचे प्रा. फादर ॲलेन जोसेफ यांच्या हस्ते करण्यात आले. तर ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या संघांनी विविध वयोगटांत उल्लेखनीय यश संपादन करून रोहा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला. या स्पर्धेत ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या 14 वर्षे वयोगट मुले व मुली प्रथम क्रमांक, 17 वर्षे वयोगट मुले व मुली प्रथम क्रमांक, 19 वर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक तर मुलीनी द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यार्थी वर्गाच्या या यशामध्ये शाळेचे नेटबॉल प्रशिक्षक सुधीर जंगम यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि खेळाडूंची मेहनत, शिस्त व सांघिक भावना महत्त्वपूर्ण ठरली. प्रशिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी मैदानावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मागील काही वर्षांपासून ग्रेगोरियन पब्लिक स्कूल, रोहा येथील खेळाडू विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विभागीय तसेच राज्यस्तरावर आपली चमक दाखवत आहेत. शाळेने क्रीडा क्षेत्रात निर्माण केलेली ही यशस्वी परंपरा यंदाही कायम राखली आहे. तर या स्पर्धेच्या वेळी म्हस्के आणि अमर सलागरे यांची विशेष उपस्थिती होती. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजयी खेळाडू, प्रशिक्षक, प्राचार्य आणि शाळेचे व्यवस्थापन यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version