अमर क्रीडा, सिद्धीप्रभा, ओम् पिंपळेश्वर, अंकुर स्पोर्ट्सचीविजयी सलामी
| मुंबई | प्रतिनिधी |
अमर क्रीडा मंडळ, सिद्धीप्रभा फाऊंडेशन, ओम् पिंपळेश्वर मंडळ, अंकुर स्पोर्टस् यांनी विजय नवनाथ मंडळाने आपल्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त आयोजित पुरुष प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथील फिनिक्स टॉवर शेजारी असलेल्या मैदानावर झालेल्या उद्घाटनीय सामन्यात काळाचौकिच्या अमर मंडळाने लोअर परेलच्या यंग विजयला 55-25 असे सहज नमवित विजयी सलामी दिली. तर प्रभादेवीच्या सिद्धीप्रभा फाऊंडेशनने करिरोडच्या अशोक मंडळाचा प्रतिकार 46-33असा मोडून काढला. शेवटच्या सामन्यात सातरस्त्याच्या अंकुर स्पोर्टस्ने प्रभादेवीच्या विकास मंडळावर 46-33 अशी मात केली. या अमृत महोत्सवी स्पर्धेचे उद्घाटन आ. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ. सचिन आईर, आ. सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.