जिल्हास्तरीय पंच परीक्षा

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई शहर कबड्डी असो.च्या विद्यमाने रविवार दिनांक 30 जून रोजी जिल्हास्तरीय पंच परीक्षा घेण्यात येणार आहे. या पंच परीक्षेकरीता सोमवार (दि.24) पासून मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. तरी जिल्हा संघटनेला संलग्न असलेल्या संघाच्या ज्या सदस्यांना ही परीक्षा द्यावयाची असेल त्यांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पूर्ण भरून प्रवेश शुल्कसह शनिवार (दि.22) पर्यंत कार्यालयात जमा करावेत. अधिक माहितीकरिता पंच समितीचे अध्यक्ष महेंद्र हळदणकर (9869878581) किंवा सचिव सूर्यकांत देसाई (9869003228) यांच्याशी प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

Exit mobile version