जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील तिवरे शाळेचे शिक्षक रविंद्र आंधळे यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक प्रतिकृतीमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. कळंबोली 51 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. बुधवारी (दि.31) बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. आंधळे यांनी हसत खेळत ज्ञानरचनावाद ही प्रतिकृती तयार केली होती. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील शिक्षक, विद्यार्थी, नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवरांनी रवींद्र आंधळे यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version