जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात

15 तालुक्यांतून तीनशे कुस्तीगिरांचा सहभाग

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शासनमान्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कूल खोपोलीच्या यजमानपदाखाली दि. 24 व 25 दरम्यान पार पडल्या.

या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधून जिल्हास्तरीय स्पर्धेस निवड झालेल्या 300 हून अधिक कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील शालेय मुले व मुली यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारे खेळाडू हे मुंबई विभाग स्तरावरील स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन खोपोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, स्वामीनी संस्थेच्या अध्यक्षा कांचन जाधव, कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कूलच्या मुख्यध्यपिका सिस्टर निर्मल मारिया, जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष सुभाष घासे, खजिनदार दत्तात्रय पालांडे, अलिबाग तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जयंद्र भगत, कर्जतचे भगवान धुळे, राज्यस्तरीय पंच राजाराम कुंभार, सावळाराम पायमोडे, वैभव मुकादम, विनोद जाधव, प्रा. धनश्री गौडा, समीर शिंदे, अमित विचारे, विजय चौहान, दिवेश पालांडे, जयेश खरमारे, भरत शिंदे, दिलीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ खोपोली नगरपरिषदेचे मा. नगरसेवक तथा खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष अमोल जाधव व रायगड जिल्हा भाजप महिला आघाडी अध्यक्षा अश्‍विनी पाटील यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कूलचे शारीरिक शिक्षक जगदीश मरागजे यांनी नियोजनात पुढाकार घेतला होता. रायगड जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी विजयी स्पर्धकांचे व आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.

Exit mobile version