| पनवेल | वार्ताहर |
अमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्ट्स फाउंडेशन-नवी मुंबई यांच्यावतीने ‘जिल्हा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025′ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा पनवेलमधील हाय-फिटनेस स्टुडिओ येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. हि स्पर्धा महाराष्ट्र पॉवरल लिफ्टिंग संघटनेचे सेक्रेटरी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असून स्पर्धेत अनेक नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यावेळी बोलताना उद्योजक मिलींद पोटे यांनी सांगितले की, पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा भरविण्यात येईल. यामध्ये मास्टर रेहांश याचा मोठा सहभाग असेल. अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने पनवेलमध्ये भरविणे गरजेचे आहे.







