जिल्हा पुरवठा अधिकारी सक्तीच्या रजेवर?

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी सोनावणे दोन महिन्यांसाठी रजेवर गेल्याची चर्चा आहे. ऐन सणासुदीत रजेवर गेल्याने वेगवेगळ्या चर्चेला उत आला आहे. राजकीय वादात सापडल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रकृती बरी नसल्याने रजेवर गेल्याचे सांगण्यात आले आहे.

मधुकर बोडके यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी संजय सोनावणे यांनी गेल्या चार महिन्यापासून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनावणे रजेवर गेले आहेत. मात्र राजकिय हस्तक्षेपामुळे ते सक्तीच्या रजेवर गेल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुुरू आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदेश शिर्के यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, सोनावणे यांची प्रकृती बरी नसल्याने ते काही दिवस रजेवर गेले आहेत. सध्या कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यात अधिकारी सक्तीच्या रजेवर दोन महिने पाठविल्यास कामावर त्याचा परिणाम होण्याची भिती आहे. मात्र सोनावणे यांना प्रकृती बरी नसल्याने रजा दिली आहे, असे ते म्हणाले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय रजेवर गेले आहेत. मात्र त्याची मुदत स्पष्ट करण्यात आली नाही. सध्या त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची प्रशासकीय कामकाज सुरु आहे.

Exit mobile version