जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
३१ मार्च हा दिवस आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस यामध्ये जिल्हा रुग्णालयातील सर्व विभागातील आर्थिकबाबीविषयक कामकाजाची धावपळ तसेच अपंग प्रमाणपत्र वाटप करण्याचा दिवस यामध्येच जिल्हा रुग्णालयामध्ये श्रीमती सुमित्रा पाटील वय वर्षे ५० रा. रावे ता. पेण या सर्जरी ओपीडी मध्ये पोटदुखी व उलटया होणे हा त्रास असल्याने तपासणीसाठी आल्या होत्या यावेळी बाहयरुग्णविभागातील डॉ. परजणे यांनी त्यांना तपासले असता त्यांना अक्युट अपेंडीसायटीसचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले.
याबाबत डॉ. सुहास माने जिल्हा शल्यचिकित्सक यांना डॉ परजणे यांनी श्रीमती सुमित्रा पाटील यांची तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे असे सांगितल्यानंतर डॉ. सुहास माने आपले सर्व प्रशासकिय कामकाज बाजुला ठेऊन रुग्णाचा जीव वाचविणे गरजेचे असल्याने व ते स्वतः सर्जन असल्याने त्यांनी श्रीमती सुमित्रा पाटील यांची तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व दि. ३१ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ०७.३० वाजता यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली असून श्रीमती पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांना होणारा त्रासदेखील कमी झालेला आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. परजणे सर्जन, डॉ. घाटे भुलतज्ञ व श्रीमती रोशनी अधिपरिचारिका या उपस्थित होत्या.

Exit mobile version