| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात रविवारी, (दि. 26) ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा परियोजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जलाशयांची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करणे हा या परियोजनेचा केंद्रबिंदू होता.

संत निरंकारी मिशनचे सचिव आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजाजी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ही परियोजना संपूर्ण भारतभरात 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 730 शहरांमध्ये जवळपास 1000 राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार द्वीप समूह, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दीव दमन, दिल्ली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडु, तेलंगाना, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल इत्यादींचा समावेश आहे.
या परियोजनेअंतर्गत मिशनचे सुमारे 1.5 लाख स्वयंसेवक समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता करुन ते निर्मळ बनवतील तसेच जल संरक्षणाची प्रेरणा देतील. मिशनच्या जवळ जवळ सर्व शाखा यामध्ये सहभागी होतील आणि आवश्यकतेनुसार अनेक शाखा निर्धारित क्षेत्रामध्ये एकत्र येऊनही सामूहिक रूपात हा उपक्रम राबवीणार आहेत. दिवेआगर समुद्र किनारी जवळ जवळ सातशे बंधु भगिनीनी स्वच्छता अभियानात भाग घेतला होता.