। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षातील कार्यप्रणालीवर खुश होऊन महाजने येथील दिवीवाडीमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा रविवारी वेश्वी येथे छोटेखानी कार्यक्रमात पार पडला. यावेळी शेकापचे अॅड. आशिष बाने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
महाजनेमधील दिवीवाडीतील सागर नाईक, बाब्या नाईक, आत्माराम नाईक, गणपत नाईक, अरुण नाईक, अविनाश नाईक, दिनेश नाईक, विजय नाईक, लक्ष्मण नाईक, सुनील नाईक, समीर नाईक, दिलीप नाईक, विशाल नाईक, अनिल नाईक, सूरज नाईक, दिनेश नाईक, राज नाईक, रोशन नाईक, राम नाईक, संतोष नाईक, दिपक नाईक, संजय नाईक आदी तरुण कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकाप नेते जयंत पाटील यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षच विकास करू शकतो, असा विश्वास व्यक्त करीत दिवीवाडीमधील कार्यकर्ते शेतकरी काममगार पक्षात सामील झाले. शेकापमध्ये इन्कमिंग सुरु झाल्याने शिंदे गटातील उमेदवार दळवी यांना ऐन निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे