दिव्यांग कप 2021 क्रिकेट स्पर्धा

महाराष्ट्राचा संघ उपविजेतेपदाचा मानकरी
। तळा । वार्ताहर ।
कुलाबा दिव्यांग क्रिकेट असो. महाराष्ट्र व युनायटेड दिव्यांग क्रिकेट असो. उत्तराखंड यांच्यात युनायटेड दिव्यांग कप 2021साठी दि.28 ते 30 रोजी देहरादून, उत्तराखंड येथे दिव्यांग कप 2021चे आयोजन करण्यात आले होते. तीन सामन्यांच्या मालिकेत उत्तराखंड बाजी मारत विजेतेपद आपल नावावर केले. महाराष्ट्राच्या संघाला उपविजेतेपदावर समानाधान मानावे लागले.
उत्तराखंड संघातील दीपक कुमार यास मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार, तर महाराष्ट्र कमलाकर कोळी (जानु) यास बेस्ट बॉलर म्हणून गौरविण्यात आले. महाराष्ट्र दिव्यांग संघाकडून कल्पेश ठाकूर, रुपेश पवार, राजू वळवी, परेश बाभनीया, विजय वळवी, विकेटकिपर नीरज सिंग, कर्णधार रमेश संकपाल, विवेक कदम, कल्पेश तवले, वैभव सकपाळ, विनोद पेडामकर, निखिल सुरवसे या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली.
हा दौरा पूर्ण करण्यासाठी सहव्यवस्थापक व फिजिओथेरपीझ सुनील पाटील, कोच व अध्यक्ष शशांक हिरवे, हुतात्मा हिरवे गुरूजी सामाजिक विकास मंडळ पनवेल व स्मरणार्थ लक्ष्मण अलजी राठोड मुंबई यांनी भरघोस मदत केली, असे संघाचे व्यवस्थापक व सचिव शिवाजी पाटील यांनी प्रतिनिधीशी सांगितले. दिव्यांग हा दिव्यांग (अपंग) नसून, इच्छाशक्तीच्या बळावर काय काय करू शकतो, हे समाजाला सिद्ध करून दाखवून दिले आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र दिव्यांग संघाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version