। गडब । वार्ताहर ।
ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर डिसेबल्ड आयोजित, अंपग कल्याणकारी संस्था रायगड, दिव्यांग क्रीडा असोसिएशन नवी मुंबई, काळंबादेवी युवक क्रीडा मंडळ गडब यांच्या सहकार्याने रविवार, दि. 22 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय दिव्यांग (पॅरा) कबड्डी स्पर्धेचे आयोजन गडब, ता. पेण, जि. रायगड येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषक वितरणासाठी रा.जि.चे माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, महाराष्ट्र राज्य अपंग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, माजी आमदार धैर्यशील पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रसाद भोईर, जि.प.चे माजी सदस्य प्रभाकर म्हात्रे, एचआर जॉन्सन कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद जोशी, सरपंच अर्पणा कोठेकर, माजी उपसरपंच नितीन पाटील, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील आठ संघ सहभागी होणार आहेत.