| अलिबाग | वार्ताहर |
नागाव वंखनाथ मंदिर येथे सोमवारी दि.13 रोजी दीपावली पहाटचे आयोजन करण्यात आले होते. नवनिर्वाचित सरपंच हर्षदा मयेकर यांचे उपस्थित दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. श्री.वंखनाथ ग्रामस्थ मंडळी व नागाव एकता सामाजिक मंडळ अध्यक्ष सुरेंद्र नागलेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमास निलेश जंगम यांचे मार्गदर्शनाखाली अरूण नवनागावकर, संजय डबे आग्राव, पुजा पाटील यांच्या गायकीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. त्यांना महेश ठाकूर तर श्रीधर पाटील यांनी साथ दिली.
यावेळी नागाव पंचक्रोषितील भजन पंरपरा जतन करून ठेवणारे अनिकेत गुरव नवापाडा, मनोहर नाईक नाईक आळी, नितिन नाईक, प्रशांत किर, धाबीर प्रासादिक जयंवत घरत डावाळे भजन मंडळी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय राऊळ, शुभम नागलेकर, संकेत नागलेकर, विशाल म्हात्रे, कल्पेश नाईक, स्वप्नील नाईक, महेश नाईक, अनिल नाईक, देवेन नाईक, उमेश किर, अजित इकर, कमळाकर शेवडे, नथुराम मगर, समिर, नाईक, स्वप्नील डळे, औकांर कवळे शुभम नाईक, रोहित म्हात्रे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे निवेदन नरेंन्द्र पाटील तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुधीर सावंत यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुरेंन्द्र नागलेकर यांनी केले. कार्यक्रमास नवनिर्वाचित सदस्य निखिल मयेकर, सुरज म्हात्रे, मंगला नागे, अनिरूद्ध राणे, रोहिणी घरत, निकिता पाडेकर, प्रियांका राणे, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, व द्वारकानाथ नाईक, ॲड. सुहास कारूळकर उपस्थित होते.