। कर्जत । वार्ताहर ।
माथेरानच्या अधिक्षकपदी सांगली येथील तहसीलदार दिशांत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गतवर्षातील ऑगस्ट महिन्यात यापदी रुजू असलेले बापू भोई यांची बदली झाली होती. या बदलीनंतर गेली पाच महिने येथील अधिक्षक पदाचा अतिरिक्त कारभार कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे देण्यात आला होता. सद्यःस्थितीत दिक्षांत देशपांडे यांनी आपला पदभार सांभाळला असून येथील कारभार स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्यासाठी तसेच नागरिकांची कामे लवकरात लवकर कशी होतील याला प्राध्यान देण्यासोबतच महसूलवाढी करिता ही प्रयत्न केले जातील, असे वचन दिले आहे.