डीएल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर

। रायगड । प्रतिनिधी ।

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून (दि.3) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, पहिल्या फेरीचे प्रवेश (दि.27) जूनपासून सुरू केले जाणार आहेत.

एससीईआरटीकडून डी.एल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लगबग सुरू होते. त्यात काही विद्यार्थी बारावीनंतर डी.एल.एड अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. यंदा विद्यार्थ्यांना (दि.3) जून ते (दि.18) जून या कालावधीत डी.एल.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून अर्जाची पडताळणी (दि.3) ते (दि.19) जून या कालावधीत केली जाणार आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी (दि.26) जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. पात्र विद्यार्थ्यांना (दि.27) जून ते (दि.1) जुलै या कालावधीत प्रवेश घेता येईल. दुसर्‍या फेरीसाठी (दि.2) जुलैला विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय भरता येणार असून पूर्वी भरलेले पर्याय बदलता येतील. (दि.4) जुलैला प्रवेशाची दुसरी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसर्‍या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना (दि.4) ते (दि.8) जुलै या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशाची तिसरी फेरी (दि.11) जुलै रोजी सुरू होणार आहे. एससीईआरटीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शासकीय आणि व्यावसायिक कोट्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय आणि प्रवेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल रेखाराव यांनी केले आहे.

Exit mobile version