|नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील गजाननबुवा पाटील इमारतीत राहणारे 45 वर्षीय ज्ञानेश्वर लोटीराम झांजे हे 19 ऑक्टोबर रोजी बदलापूर येथे रेल्वे स्थानकातून हरवले आहेत. नेरळ पोलीस ठाण्यात झांजे यांच्या हरवण्याची तक्रार त्यांच्या पत्नी करुणा यांनी दाखल केली आहे. याबाबत कोणालाही कोणत्याही स्वरूपातील माहिती मिळाल्यास त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन नेरळ पोलीस ठाण्याने केले आहे.