| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोणत्याही मोहाला बळी न पडता अर्थिक सल्लागारांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करा असा मौलित सल्ला ज्येष्ठ अर्थ तज्ज्ञ समीर दिघे यांनी कुरुळ येथे दिला.
अलिकडच्या काळात आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत चाललेल्या दिसत आहेत. रोजच्या वृत्तपत्रात अशा बातम्या वाचनात येत आहेत. पुन्हा-पुन्हा लोक फसत आहेत. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून कुरूळ येथील संघर्ष सुशिक्षित बेरोजगारांची सेवा सहकारी संस्थेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या वतीने अर्थिक फसवणूक सतर्कता विषयावर अर्थिक सल्लागार समीर दिघे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सरपंच स्वाती पाटील यांचे हस्ते या कार्यक्रमाला दिप प्रज्वलित करून सुरुवात करण्यात आली. दिघे यांनी आपल्या भाषणातून आर्थिक फसवणूक कशी व कशाप्रकारे केली जाते याबाबत उदाहरणासह माहिती देत याबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अवधूत पाटील, आकाश घाडगे, भुषण बिर्जे, रेश्मा पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष रवी मगर, संघर्ष सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थेचे कुरूळ अध्यक्ष योगेश घाडगे, प्रकाश कार्लेकर, देवेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.