35 प्राथमिक शाळा अनधिकृत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील 35 शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांनी केले आहे. त्यात श्रीवर्धन तालुक्यातील 3, म्हसळा तालुक्यातील 3, खालापूर तालुक्यातील 2, कर्जत तालुक्यातील 1, उरण तालुक्यातील 1, अलिबाग तालुक्यातील 2, महाड तालुक्यातील 1 तर पनवेल तालुक्यातील 22 शाळांचा समावेश आहे. या अनधिकृत शाळांना शिक्षण विभागाच्या वतीने आरटीई कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांनी सांगितले आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील आराठी येथील किड्स पॅरेडाईस प्रि स्कूल, इंपेरिअल स्कूल अयार मोहल्ला, रानवली येथील अंजुमन इस्लाम जंजिरा, म्हसळ्यातील अल इहसान इंग्लिश स्कूल, इतकान इंग्लिश स्कूल गोंडघर, ए.आर. उंड्रे इंग्लिश स्कूल मेंदडी, खालापूरमधील सेंट मेरी स्कूल कोपरी, भारती ॲकेडमी ॲण्ड ज्युनियर कॉलेज खोपोली, कर्जतमधील बांधिवली येथील सेंट औरा ई-टेक्नो स्कूल, उरणमधील नागराज स्कूल बोरी, अलिबागमधील बोडणी येथील ज्ञानार्जन प्रि प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल, सक्सेस एज्युकेशनल ॲण्ड वेल्फेअर सोसायटी एमएसटी इंटरनॅशनल स्कूल, महाडमधील लिटील एंजल स्कूल पानसरी मोहल्ला, पनवेलमधील विचूंबे येथील आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल, नेरेमधील न्यू इंग्लिश स्कूल, करंजाडे येथील एसजीटी इंटरनॅशनल स्कूल सेक्टर 4, बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल सेक्टर 3, वेदिक ट्री इंटरनॅशनल स्कूल सेक्टर 3, दापोली येथील दि वृद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल ओवळेध, वावंजे येथील सनराईज इंग्लिश स्कूल, लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, खारपाडा येथील साई गणेश एज्युकेशन सोसायटी नवजीवन इंटरनॅशनल स्कूल, शिरढोणपाडा येथील सेंट ग्रेगोरियस हायस्कूल, कळंबोली येथील ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल, मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, काळसेकर इंग्लिश मिडीयम स्कूल पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, द वेस्ट हिल इंटरनॅशनल स्कूल तळोजा, ओशियन ब्राईट कॉन्वेंट हायस्कूल तळोजा, रोहिंजण इंग्लिश स्कूल, बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा, राईजिंग इंटरनॅशनल स्कूल कोपर उलवे, एसएमबी इंटरनॅशनल स्कूल उलवे, शाहीर बाळाराम पाटील इंग्लिश स्कूल शेडुंग, लक्ष्मी पब्लिक स्कूल सांगडे या प्राथमिक शाळा अनधिकृत असल्याची घोषणा प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांनी केली आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी ही यादी जाहीर केली आहे.






