तुम्हाला माहित आहे, ओझोन दिवस का साजरा करतात?

| माणगाव | प्रतिनिधी |
मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर सह्या केल्याच्या औचित्याने दरवर्षी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. ओझोन थराला नुकसान पोहोचवणाऱ्या पदार्थांचे उत्पादन आणि उपभोग टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण करारावर स्वाक्षरी केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो.

याला 1987 मध्ये सुरुवात झाली. ओझोन थराचा ऱ्हास का आणि कसा थांबवावा? याविषयी जनजागृती दिन म्हणूनही हा दिवस पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधुन हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, महाड महाविद्यालयात “हवामान बदलाचे प्रमाण कमी करून ओझोन थराचे संवर्धन करणे“ या विषयावर पोस्टर बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन दि. 16 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांमध्ये मानवी कृतींमुळे पर्यावरणात होणाऱ्या बदलांवषयी व त्यांच्या परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाविषयी विचार करण्यास प्रेरित करण्याच्या हेतूने या या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून अतिशय सुंदर प्रकारे पोस्टर बनवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया, संचालिका सोनाली धारिया यांच्या प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांना पर्यावरणाशी संलग्नित गोष्टींची, जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या प्रमुख सल्लागार डॉ. संध्या कुलकर्णी व महाविद्यालयाचे प्राचार्य सुदेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

Exit mobile version