। कोर्लई । वार्ताहर ।
गेल्या अनेक महिन्यांपासून मुरुड तालुक्यातील बोर्ली-मांडला प्राथमिक आरोग्य केंद्रात एम्.बी.बी.एस्.डॉक्टर नसल्याने आरोग्य सेवेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून शासनाच्या संबंधित आरोग्य विभागाने याची तातडीने दखल घेऊन योग्यती उपाययोजना करण्यात यावी.अशी मागणी बोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ.चेतन जावसेन यांनी केली असून याबाबत आपण लवकरच तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करणार असल्याचे सांगितले.
बोर्ली-मांडला प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी पदे असून एक एमबीबीएस व दुसरे बीएएमएस.आहे.यातील एमबीबीएस.वैद्यकीय अधिकारी हे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने गैरहजर असल्याने आरोग्य सेवेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सहा उप आरोग्य केंद्र असून जवळच काशिद बीच पर्यटन स्थळ असल्याने वेळप्रसंगी वाहतुकीच्या वर्दळीने अथवा समुद्रात बडून घडणार्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही.यापुर्वी देखील अपघाताच्या घटना घडल्या आहेत.अशावेळी गेल्या अनेक महिन्यांपासून याठिकाणी पोष्टमार्टम करण्यासाठी एम्.बी.बी.एस्. डॉक्टर नसल्याने खुप गैरसोय होत आहे. मी बी.ए.एम.एस.वैद्यकीयअधिकारी असल्यामुळे याठिकाणी पोष्टमार्टम करु शकत नाही.यामुळे वेळेवर पोष्टमार्टम करण्यासाठी या दवाखान्यात एम्.बी.बी.एस्. वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे.असे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश्री जगताप यांनी सांगितले.
बोर्ली-मांडला प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मग पोष्टमार्टमचा विषय आल्यास अडचणीचे असल्याचे दिसून आलेले आहे. वैद्यकीय अधिकारी अनेक महिन्यांपासून सातत्याने गैरहजर असल्याने योग्य ती कार्यवाही होऊन तातडीने या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत. डॉ.चेतन जावसेन, सरपंच : ग्रुप ग्रामपंचायत,बोर्ली