क्रिडा प्रकार महत्वाचा असल्याचा दिला संदेश
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग मुरुडमधील डॉक्टरांनी डॉक्टर व त्यांच्या कुटूंबियासाठी क्रीडा स्पर्धा अलिबाग जवळील आरसीएफ वसाहतीमधील क्रीडा संकुलात आयोजित केली होती. वैद्यकिय उपचाराबरोबरच शरीर फिट ठेवण्यासाठी वैयक्तीक व सांघिक क्रीडा प्रकार महत्वाचा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
अलिबाग व मुरुड मेडिकल असोसिएशनच्यावतीने क्रीडा स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यामध्ये क्रिकेट, बॅटमिंटन, कॅरम, टेबल टेनिस आदी स्पर्धा भरविण्यात घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 153 डॉक्टरांसह त्यांचे कुटूंबिय सहभागी झाले. या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ शरीर सौष्ठव स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करणारे सचिन पाटील, प्रो कबड्डीचे खेळाडू केदार लाल, तसेच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणार्या रायगड पोलीस दलातील जिया चव्हाण या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. धावपळीच्या जीवनात नागरिकांचे आरोग्यकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनेक आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत आहे. परंतू वैद्यकिय उपचाराबरोबरच मानसिक व शारीरिक तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी नियमीत कसरत व खेळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन रविवारी क्रीडा स्पर्धा भरविली. या स्पर्धेतून शरीर सदृढ ठेवण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी डॉ. मयूर कल्याणी, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. अशिष भगत, डॉ. गणेश गवळ