ग्रामपंचायत विरोधात डॉक्टरांचे उपोषण

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ गावातील डॉ. दिनकर सरोदे यांच्या मालकीच्या जागेवर त्यांना घर बांधण्याची परवानगी देण्यास नेरळ ग्रामपंचायत गेली तीन वर्षे आडकाठी करीत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत प्रशासन विरोधात संबंधित डॉक्टर आणि पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते 19 जुलै पासून उपोषणाला बसणार आहेत.

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत येथील डॉ. दिनकर सरोदे (70) हे नेरळ येथे कायमस्वरूपी रहिवाशी असून ते त्यांच्या घरात गेली 30 वर्षापासून स्वतःचा दवाखाना चालवत आहेत. जुना मोडकळीस आलेला दवाखाना मोडुन नवीन दवाखान्याचे बांधकाम करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीकडे गेले दीड वर्षे बांधकाम परवानगी मागत आहेत. त्यांना नेरळ ग्रामपंचायतीकडून बांधकाम करण्यासाठी ग्रामसेवक यांनी अटी शर्ती पुर्ण करुन देण्यात याव्यात नंतर बांधकाम परवानगी दिली जाईल असे पत्र दिले. पत्रानुसार सर्व अटी त्यांनी पुर्ण करुन दिल्या तरीसुद्धा त्यांना ग्रामसेवक यांनी बांधकाम परवानगी देत नसल्याने अखेर ग्रामपंचायत विरोधात 19 जुलै रोजी लोकमान्य टिळक चौक कर्जत येथे बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी माहिती दिली आहे.

Exit mobile version