महिला पशुधन विकास अधिकार्‍याचा कौटूंबिक छळ

पुण्यातील डॉक्टर पतीसह सासरा, नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दवाखाना विकत घेण्याकरीता पाच लाखाची तसेच दरमहा पगाराची मागणी पुर्ण न करणार्‍या महिला पशुधन विकास अधिकारी यांचा छळ करणार्‍या पुण्यात डॉक्टर असलेल्या पतीसह सासरा आणि नणंद यांच्याविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबतचे वृत्त असे की, महिला पशुधन विकास अधिकारी असणार्‍या महिला फिर्यादी रा.निंबाळकर वस्ती, गुजरवाडी रोड,पाथरज पुणे जिल्हा पुणे सध्या रा. तळकरनगर रामनाथ रोड ता.अलिबाग यांचा डॉक्टर असलेल्या इसमासोबत विवाह झाला आहे. फिर्यादी या पशुधन विकास अधिकारी असल्याचे पाहुन त्यांच्याकडुन दवाखान विकत घेण्याकरीता 5 लाख रुपयांची तसेच दरमहिन्याचा मिळणारा पगाराची मागणी पती, सासरे, व नणंद करत होते. ती मागणी फिर्यादी यांनी पुर्ण केली नाही त्या गोष्टीचा मनात राग धरून फिर्यादी ज्या-ज्या वेळी पुणे येथे जात होत्या, त्यावेळी फिर्यादी तु चांगली नाहीस, पुणे येथे येऊ नकोस, तुझा आमचा काही एक संबध नाही, घटस्फोट दे असे घालून पाडून बोलत असे. तसेच फिर्यादीवर संशय मारण्याची धमकी देत शरीरीक व मानसिक छळ जाच सुरु केला होता. यासंदर्भात फिर्यादीने अलिबाग पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक फौजदार शेंबडे करीत आहेत.

Exit mobile version