जासईत इंडिया आघाडीचे वर्चस्व

| उरण | प्रतिनिधी |

लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव असलेल्या आणि वार्षिक पावणे दोन कोटी आर्थिक उत्पन्न असलेल्या जासई ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इंडिया महाआघाडीने कंबर कसली आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून दिबांचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या जासई ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा एखादा अपवाद वगळता कायम शेकापचेच वर्चस्व राहिले आहे.

मागील निवडणुकीपासून सलग सात वर्षे सरपंच व ग्रामपंचायतीचा धुरा सांभाळणाऱ्या आणि सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जाणाऱ्या संतोष घरत हे सेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्ष्यांच्या महाआघाडीने भाजपला निवडणूकीत चारमुंड्या चीत करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. जासई ग्रामपंचायतीमध्ये सहा प्रभाग आहेत. या सहा प्रभागातून थेट सरपंच पदासह 16 सदस्यपदासाठी 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. थेट सरपंचाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. तर प्रभाग क्रमांक तीनमधुन इंडिया महाआघाडीच्या सृष्टी म्हात्रे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित 16 सदस्यपदासाठी 34 उमेदवार निवडणूक लढवित असल्याने महाआघाडी विरोधात भाजप अशी सरळ लढत होणार आहे. या मतदार संघात 4182 मतदार आहेत. मागील निवडणुकीत स्थबळावर शेकापने निवडणूक लढविली होती. थेट सरपंचपदी झालेल्या निवडणुकीत संतोष घरत विजयी झाले होते. तसेच शेकापने सत्ताही काबीज केली होती. या निवडणुकीतही सरपंचपदासाठी इंडिया महाआघाडीचे अनुभवी संतोष घरत यांना उमेदवारी दिली आहे.

महाआघाडीचे शिवसेनेचे बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस कमिटीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे.एम.म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार सुरू आहे.

Exit mobile version