ठाणे येथील महिलेला जीवनदान

माणगाव सेवाभावी संस्थेचे मानले आभार

| माणगाव | प्रतिनिधी |

ठाणे येथील वयोवृद्ध महिलेला प्रकृती अस्वास्थामुळे रक्ताची गरज होती. त्या महिलेला आवश्यक असलेला रक्तपुरवठा माणगाव उपजिल्हा रुग्णालयातून शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्था माणगाव यांच्या पदाधिकार्‍यांनी त्वरित विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी माणगावच्या या सेवाभावी संस्थेचे आभार मानले.

ठाणे येथील वयोवृद्ध महिला सुनीता सुनील पौडवाल (वय-66) या महिलेला प्रकृती अस्वास्थामुळे माणगाव येथील डॉ. तुषार शेट यांच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या महिलेची प्रकृती पाहिल्यावर डॉ.शेट यांनी त्यांना रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांनतर रुग्ण महिलेचे माणगाव येथील नातेवाईकांनी संस्थेचे माणगाव अध्यक्ष सलीम शेख व अरुण क्षीरसागर यांच्याकडे संपर्क साधून महिलेला दोन बॉटल रक्त पाहिजे असल्याचे सांगितले. शेख यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील प्रयोग शाळा सहाय्यक जितेश मोहिते यांच्याशी संपर्क साधून महिलेला ‘बी पॉझिटिव्ह’ ग्रुपच्या 2 रक्त बॉटलची आवश्यकता असल्याचे सांगितल्यावर लगेचच मोहिते यांनी रक्त बॉटल उपलब्ध असल्याचे सांगितले. प्रयोग शाळा सहाय्यक जितेश मोहिते यांची भेट घेऊन या रुग्ण महिलेला आवश्यक असणार्‍या रक्त बॉटल विनामूल्य उपलब्ध करुन दिले. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सलीम शेख, अरुण क्षीरसागर, भालचंद्र खाडे, राहुल दसवते, फहद करबेळकर, गणेश निजापकर यांचे आभार मानले.

Exit mobile version