आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळांना देणगी

गावंड परिवाराची सामाजिक बांधिलकी

। खरोशी । वार्ताहर ।

इंदुबाई रामदास गावंड यांचा मृत्यु 2 जून रोजी झाला आणि गावंड परिवारातील मायेची शाल हरपली. वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाल्यामुळे त्यांच्या पश्‍चात 09 मुले, 09 सुना, 24 नातवंड, 20 पतवंड, 07 नात सुना, 7 नात जावई असा मोठा परिवार आहे.

यावेळी त्यांचे पुत्र नवनीत गावंड व साईनाथ गावंड यांनी सांगितले की, आईचा स्वभाव म्हणजे मायेची सावली, गोड व शुद्ध वाणी, संगीत प्रेमी, हसतमुख चेहरा, व्यवहार चातुर्य, योग्य निर्णय शक्ती, नऊ मुलांचा संसाराचा गाडा अगदी कष्टाने ओढत सर्व मुलांना उत्तम शिक्षण दिले. त्यामध्ये डॉक्टर, शिक्षक, प्राचार्य, ग्रामसेवक, औषध निर्माता अशी विविध क्षेत्रात सर्व मुले भूमिका बजावत आहेत.

आईला श्रद्धांजली म्हणून 4 जूनपासून 13 जूनपर्यंत दररोज हरिपाठ, स्वर्ग रोहन अध्याय आणि भजन कीर्तन यांचे आयोजन केले होते. आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवस कार्याला वैयक्तिक वस्तूभेट न देता मंदिरे आणि ज्ञानमंदिरांना आर्थिक व वस्तुरूपी मदत देऊन समाजोपयोगी एक नवा पायंडा आमच्या गावंड परिवारामार्फत घातला गेला आहे. या आधीही वहिनीच्या स्मृतिप्रीत्यर्थ अशाच प्रकारची मदत केली आहे. आईच्या स्मरणार्थ विठ्ठल रखुमाई मंदिर आवरे येथे एक लाख रुपये देणगी, संत साईबाबा प्राथमिक शाळा नवीन पनवेल येथे एक संपूर्ण साऊंड सिस्टिम व ब्लूटूथ स्पीकर, साई मंदिर आवरे या ठिकाणी एक संपूर्ण साऊंड सिस्टिम व ब्लूटूथ स्पीकर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन भागशाळा खोपटे या ठिकाणी एक संपूर्ण साऊंड सिस्टिम व ब्लूटूथ स्पीकर, भोलानाथ मंदिर आवरे या ठिकाणी एक संपूर्ण साऊंड सिस्टिम व ब्लूटूथ स्पीकर तसेच 06 सिलिंग फॅन आईच्या आठवणीनिमित्त देण्यात आले. सांत्वनासाठी माननीय आमदार जयंत भाई पाटील, माजी नगराध्यक्ष माननीय जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी आमदार मनोहर भोईर, आमदार महेश बालदी, माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, माजी सभापती काशिनाथ पाटील, माजी सभापती नरेश घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप परदेशी, माजी उपसभापती वैशाली पाटील, विकास घरत उपस्थित होते.

Exit mobile version