लसीकरणाची भीती बाळगू नका

डॉ. मधुकर ढवळे यांचे आवाहन
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासनाच्या मिशन युवा स्वास्थ्य या अभियानांतर्गत 18 वर्षापुढील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे आयोजन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे 25 आॉक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. शासनाने युवा स्वास्थ्य मिशन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरु केले आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन डॉ. मधुकर ढवळे यांनी गोखले महाविद्यालयात लसीकरण अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी केले.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी, डॉ. सिमरन मॅडम, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोर लहारे, प्रा. वाल्मिक जोंधळे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.आनंद जोशी, आरोग्य विभागाचा स्टाफ, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पहिल्या विद्यार्थ्याला स्वतः डॉ. ढवळे यांनी लसीकरण केले. सदर अभियानाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी विशेष प्रयत्नशील आहेत. प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी, नॅक समन्वयक डॉ. कल्याणी नाझरे, प्रा. निलेश चव्हाण, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा किशोर लहारे, प्रा. वाल्मिक जोंधळे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी या मिशनसाठी प्रयत्न करीत आहेत. दोन दिवसांच्या या विशेष लसीकरण मोहिमेचा एकूण 134 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

Exit mobile version