गाफील राहू नका, कधीही निवडणुका; अजित पवारांचे सूचक वक्तव्य

। मुंबई । वृत्तसंस्था ।
“राज्य सरकारने निवडणुकीसाठी केलेला कायदा न्यायालयात टिकला नाही तर निवडणुका लगेचच होऊ शकतात. त्यामुळे निवडणुका सहा महिने पुढे गेल्या असे समजून गाफील राहू नका. निवडणुका अचानक जाहीर झाल्यास तेव्हा मला दोष देऊ नका”, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहरातील तब्बल 31 विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन पार पडले. यावेळी विविध विषयांवर पवार यांनी संवाद साधला. ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे, असेही पवारांनी म्हटले. त्याकरिता उच्च न्यायलाय निर्णय घेणारच आहे. परंतु, त्यामुळे निवडणुका सहा महिने पुढे गेल्या असे समजून गाफील राहू नका. प्रभागातील कामे सुरू ठेवा असेही पवार यांनी सूचित केले.

Exit mobile version