अफवांना बळी पडू नका; सिडकोचे आवाहन

| नवी मुंबई | वार्ताहर |

सिडको महामंडळामार्फत नवी मुंबईतील विविध ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका बांधण्यात येत आहेत. सिडकोने या सदनिकांच्या विक्रीसाठी कोणत्याही सेवा केंद्र अथवा एजन्सीची नेमणूक केलेली नाही. याबाबत खासगी व्यक्ती किंवा संस्था यांच्यामार्फत पसरविण्यात येणार्‍या खोट्या व चुकीच्या जाहिराती/योजना/बातम्या यांना बळी पडू नये, असे आवाहन सिडकोतर्फे जनतेस करण्यात आले आहे. अशा अफवांना बळी पडून फसवणूक झाल्यास त्यास सिडको जबाबदार राहणार नाही, याची कृपया सर्व नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी, असे सिडकोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, खोट्या बातम्या अथवा माहिती निदर्शनास आल्यास जनतेनी कृपया सिडकोच्या दक्षता विभाग, 6 वा मजला, सिडको भवन यांच्याकडे लेखी तक्रार करावी. तसेच सिडकोमार्फत जाहीर करण्यात येणार्‍या योजनेबाबत अधिकची माहिती हवी असल्यास किंवा योजनेत अर्ज दाखल करण्यात अडचणी येत असतील तर त्याचे निराकरण करण्यासाठी निवारा केंद्र, 7 वा मजला, बेलापूर रेल्वे स्थानक, नवी मुंबई किंवा पणन (गृहनिर्माण) विभाग, 3 रा मजला, रायगड भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असेही सिडकोकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version