न.प.कडून घरोघरी कुंड्यांचे वाटप

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा नगर पंचायतीमार्फत संपूर्ण म्हसळा शहराच्या स्वच्छतेचा संकल्प घेतला असून, स्वच्छ म्हसळा, सुंदर म्हसळा हा उपक्रम सध्या सुरु आहे. म्हसळा नगरपंचातीस स्वच्छतेचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून, संपूर्ण महाराष्ट्रात म्हसळा नगरपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी करून पहिल्या पंधरामध्ये येण्याचा बहुमान मिळविला आहे.

म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविले जात असून, नगराध्यक्ष असल कादिरी, उपनगराध्यक्ष संतोष शेडगे, सर्व नगरसेवक, संपूर्ण प्रशासकीय टीम, स्वच्छता कर्मचार्‍यांचे उत्तम प्रकारे सहकार्य लाभत आहे. खा. सुनील तटकरे, माजी पालकमंत्री तथा आ. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नातून नगरपंचायतीस वैभव प्राप्त झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरपंचायतीतर्फे सुका आणि ओला कचरा असे वर्गीकरण करण्यात आले असून, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी योग्य नियोजन केले आहे. शहरातील सर्व वॉर्डातून नगरसेवकांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या सहकार्यातून कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका राखी करंबे, नगरसेवक संजय कर्णिक, नगरसेवक अनिकेत पानसरे, अजय करंबे, संतोष कुडेकर, बाबू चाळके, अशोक सुतार, अजित कळस आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version