बेणसे ग्रामपंचायत तर्फे घरोघरी वीमाकवच

प्रत्येक कुटुंबप्रमुखाची 10 लाखांची पॉलिसी

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

बेणसे ग्रामपंचायतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत घरोघरी वीमाकवच मोहीम सुरु केली आहे. गावातील प्रत्येक कुटुंबप्रमुखाची 10 लाखांची पॉलिसी उतरविण्याचा ठराव केला आहे.

सदस्य उध्दव कुथे यांच्या संकल्पनेतून आणि सरपंच मधुकर पारधी, उपसरपंच सपना पांढरे,राजेश गोरे, प्रीती कुथे, प्रगती गोरे, सुलताना मांढरे, संतोष अडसुळे, सूर्यकांत पवार, ग्रामसेवक सचिन घरत यांनी बेणसे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. याबाबतची घोषणा कुथे यांनी ध्वजारोहणानंतर केली.

योजनेचा लाभ घ्यावा

बेणसे ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंब प्रमुखाचा विमा पॉलिसी काढण्याचा निर्णय घेतला असून इतरही ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा निर्णय घ्यावा, असे आवाहन उद्धव कुथे यांनी केले.अपघात व आरोग्याशी निगडीत असलेला विमा पॉलिसीचा लाभ प्रत्येक कुटुंब प्रमुखाने घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना प्राथमिक, पायाभूत , मूलभूत नागरी सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी देखील केली जात आहे.

मधुकर पारधी, सरपंच
Exit mobile version