पुण्यात दुहेरी हत्याकांड

पतीने पत्नीच्या हाताची नस कापली अन् पोटच्या लेकीच्या तोंडावर उशी दाबून संपवलं

| पुणे | वृत्तसंस्था |

कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि.16) पुण्यातील कात्रज परिसरात घडली आहे.

पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून घरातील वाद विकोपाला जाऊन थेट एकमेकांचा जीव घेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातच आता दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरले आहे. कौटुंबिक वादातूनपतीने पत्नीच्या हाताची नस कापली अन् पोटच्या लेकीच्या तोंडावर उशी दाबून हत्याकेली. श्वेता तळेवाले (वय 40), शिरोली तळेवाले (वय 16) अशी खून झालेल्या दोन जणींची नावे आहेत. याप्रकरणी अजय तळेवाले (वय 45) असे आरोपीचे नाव आहे. निर्घृण हत्या  करणारा पती स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाल्याची महिती मिळाली आहे. 

Exit mobile version