आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन
| कर्जत | वार्ताहर |
भिसेगाव ते चारफाटा हा रस्ता व्हावा म्हणून अनेक उपोषणे, आंदोलने झाली, संघर्षही झाला. आज या रस्त्याचे लोकार्पण करताना मनस्वी आनंद होत आहे. हा रस्ता म्हणजे भविष्यात पाम बीच मार्गासारखा होईल. आपण सव्वाचार वर्षात साडेआठशे कोटी रुपयांचा निधी या मतदार संघात विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला. बदलते कर्जत आपण पाहत आहात. मुद्रे खुर्दजवळ केटी बंधारा बांधून त्या बॅकवॉटर परिसरात बोटिंग सुरू करण्याचा मानस आहे. त्यामुळे कर्जतच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. सध्या कर्जत नगरपरिषदे मधील गावांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे 57 कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. गुलमोहर विश्रांतीगृहाच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, तसेच शंभर खाटांचे रुग्णालय, भुयारी मार्ग मंजूर झाला असून या भुयारी मार्गाला स्व. अनंतकाका जोशी यांचे नाव देण्यात येणार आहे. भिसेगाव आंबे माता मंदिर परिसरासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करून देऊ.’ असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले.
भिसेगाव ते चारफाटा या पाच कोटी रुपये खर्चून काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्याचे व याच मार्गावर 25 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पथ दिव्यांचे लोकार्पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संतोष भोईर, मुख्याधिकारी वैभव गारवे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, नगरसेवक राहुल डाळिंबकर, सुरेखा शितोळे, पोलिस पाटील संजय हजारे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, माजी नगरसेवक बाळाजी विचारे, यमुताई विचारे, नगरसेवक उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, पुष्पा दगडे, संकेत भासे, अमोघ कुलकर्णी, उदय शिंदे आदी उपस्थित होते. बाळाजी विचारे यांनी आपल्या प्रास्तविक करताना, या रस्त्यासाठी 2014 पासून सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश आले आणि दहा वर्ष रखडलेले काम मार्गी लागले. जुन्या रेल्वे फटकाच्या येथे भुयारी मार्ग झाला पाहिजे. आमदार सर्व मतदार संघात लक्ष देतात तसेच भिसेगावाकडे सुध्दा लक्ष द्यावे. असे सूचित केले. राहुल डाळिंबकर यांनी, सर्व ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. परंतु आरपीआयला हवे आहे ते मिळत नाही. आम्ही यापूर्वी तुमच्या बरोबर होतो. आत्ताही तुमच्या सोबत राहू.असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अभिषेक सुर्वे यांनी केले.
याप्रसंगी पुंडलिक भोईर, नाथा हजारे, मोहन भोईर, नागेश भरकले, नदीम खान, गणेश गोसावी, शरद हजारे, दिनेश कडू, अशोक मोरे, नारायण जुनगरे, सनी चव्हाण, ज्ञानेश्वर कर्णुक, सायली शहासने, भारती शिंदे, अनिता जुनगरे, प्रदीप वायकर, राकेश देशमुख, ॲड. उत्तम गायकवाड, तेजस गायकर, तेजस इंगळे, किशोर कदम, विल्सन पानपाटील, संदीप कर्णुक, हर्षल मोरे, अरुण मालुसरे आदींसह भिसेगाव मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
