। उरण । वार्ताहर ।
उरण येथील बालोद्यान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 131 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगणारी भाषणे झाली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील, सहचिटनिस यशवंत ठाकूर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश राहालकर, मुख्याधिकारी संतोष माळी, जीपसदस्य विजय भोईर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, चिंतामण गायकवाड, शंकर भोईर, नारायण पाटील आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







