डॉ.दक्षता पाटील ठरली सुवर्ण पदकाची मानकरी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शहापूर येथील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता संतान पाटील यांची कन्या डॉ. दक्षता पाटील हिने डी.एम.एम. आयुर्वेदिक महाविद्यालय यवतमाळ येथे कायचिकित्सा हा विषय घेऊन चांगले घवघवीत यश संपादन केले. तसेच, ती कायचिकित्सा विषयात संपूर्ण विद्यापीठामध्ये सर्वात जास्त गुण मिळवून सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे शुक्रवारी (दि.23) दीक्षांत समारंभात राज्यपाल रमेश बैस, तसेच वैदकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते डॉ. दक्षता पाटील हिस सुवर्ण पदक देऊन तिचा सत्कार करण्यात आला.

आत्मविश्‍वास आणि डॉक्टर होण्याची महत्त्वकांक्षा व कठोर परिश्रमाच्या जोरावर डॉ. दक्षता पाटील हिने घवघवीत यश संपादन करून शहापूर गाव व समाजात नावलौकिक केले आहे. ती एका उत्तुंग यशाची मानकरी बनली आहे. या मागे तिचे अथक परिश्रम तसेच, आई-बाबांची धडपड व शुभाशीर्वाद मोलाचे ठरले आहेत.

Exit mobile version