डॉ. गजानन रत्नपारखी यांना फेलोशिपचा सन्मान

| तळा | वार्ताहर |

अखिल दैवज्ञ समाज परिषदेचे अध्यक्ष तथा मुंबईतील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांना (दि. 25) फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या सोसायटी फॉर कार्डिओ व्हॅस्कुलर अँजिओग्राफी आणि इंटरव्हेन्शन या संस्थेकडून हृदयरोग आणि संबंधित विविध शस्त्रक्रिया विषयांमध्ये उत्तुंग कार्य केल्यानिमित्त फेलोशिप प्रदान करण्यात आली. आजपर्यंत डॉ. गजानन रत्नपारखी यांनी 24000 हुन अधिक हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या असून अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. अमेरिकेच्या सोसायटी फॉर कार्डिओ-व्हॅस्कुलर अँजिओग्राफीआणि इंटरव्हेन्शन या संस्थेकडून हा आंतराराष्ट्रीय सन्मान मिळाला. अमेरिकेच्या सोसायटी फॉर कार्डिओ -व्हॅस्कुलर अँजिओग्राफी आणि इंटरव्हेन्शन ह्या संस्थेकडून सन्मान मिळवणारे डॉ. गजानन रत्नपारखी हे उच्चशिक्षित हृदयरोगतज्ञ असून मुंबईतील प्रथम इन्स्टिटयूट असण्याचा सन्मान देखील यांच्याच नावे आहे. या मिळालेल्या यशाबद्दल दैवज्ञ ब्राम्हण (सोनार) समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version