शासनाच्या फेलोशिप अभ्यासक्रमासाठी डॉ. बाळासाहेब खडबडे यांची निवड

। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे येथील सुप्रसिध्द डॉक्टर बाळासाहेब खडबडे यांच्या यशोदा हॉस्पीटलमधील फर्टिलिटी व आयव्हीएफ सेंटरला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून वंध्यत्व निवारण अभ्यासक्रमाच्या फेलोशिपसाठी मान्यता मिळाली आहे. राज्याचे वैद्यकीय विभागाचे संचालक डॉ. दिलीप जी म्हैसकर यांनी डॉ. बाळासाहेब खडबडे यांचे अभिनंदन केले आहे. सध्या बदलत चाललेली जिवनशैली, शहरीकरण, कामामधील अनिश्‍चित वेळ, व्यसनाधिनता, वेळेवर सकस आहार न घेणे, उशिरा विवाह करणे यासारख्या इतर अनेक कारणांमुळे सध्या पुरुष/स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. बरेच दांपत्य मुल न होण्याच्या समस्येमुळे त्रासलेले आहे. पनवेल परिसरातील कामोठे येथील यशोदा हॉस्पीटल येथे डॉ. बाळासाहेब खडबडे यांनी मुल न होणार्‍या अशा अनेक दांपत्यावर यशस्वीरित्या उपचार केल्याने कृत्रिम गर्भधारणेच्या माध्यमातुन अनेक महिलांना मातृत्व मिळालेले आहे.त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आजपर्यंत अतिशय उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

Exit mobile version