। कर्जत । प्रतिनिधी ।
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी नगरपरिषद कार्यालयात अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर अभिवादन केले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, पुष्पा दगडे, प्राची डेरवणकर, मधुरा चंदन, संचिता पाटील, विशाखा जिनगरे आदी सह अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
छायाचित्र: संजय गायकवाड







