डॉ. केशवराव धोंडगे अनंतात विलीन

शासकीय इतमामात शेवटचा निरोप
| नांदेड | प्रतिनिधी |
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार व खासदार डॉ. केशवराव धोंडगे यांच्या पार्थिवावर सोमवारी ( 2 जानेवारी) शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. क्रांतीभुवन बहाद्दरपुरा येथील त्यांच्या निवासस्थानी शासकीय इतमामात चाहत्यांनी साश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.

श्री शिवाजी हायस्कुल पानभोसी रोड येथे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजे पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी तीन वाजता श्री शिवाजी हायस्कूल येथून महाराणा प्रतापसिंह चौक, श्री शिवाजी चौक, गांधी चौक, विधी महाविद्यालय, बहाद्दरपुरा अशी अंत्ययात्रा कडून क्रांतिभुवन या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील, माजी मंत्री किन्हाळकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हाधिकारी नर्सिंगराव पवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

धोंडगे साहेब अमर रहे,लाल सलाम,लाल सलाम,धोंडगे साहेब लाल सलाम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.लाल बावटा,तिरंग्यात त्यांचे पार्थिव लपेटण्यात आले होते.पोलिसांच्यावतीने मानवंदना देण्यात आली.

Exit mobile version