| पाताळगंगा | प्रतिनिधी |
डॉ. महेश निमणे यांना राष्ट्रीय यशदीप वास्तु कर्तव्य पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा पत्रकार भवन, पुणे येथे उत्कर्ष भारत आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात वास्तुशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले आणि 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामध्ये मानाची पगडी, शाल आणि सन्मानपत्र देऊन डॉ. निमणे यांना सन्मानित करण्यात आले. आजपर्यंत त्यांना विविध संस्थांकडून 45 हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, समाजहित आणि वास्तुशास्त्र क्षेत्रातील संशोधन व मार्गदर्शनाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे सुरू राहील, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार डॉ. खरात, आसरा फाउंडेशन, ओम पब्लिकेशनचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात हा सन्मान सोहळा पार पडला.डॉ. महेश निमणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तुशास्त्र विषयात संशोधन, मार्गदर्शन आणि जनजागृतीचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या कार्याचा लाभ राज्यासह देशभरातील अनेक नागरिकांना झाला असून, वास्तुशास्त्राविषयी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनप्रबोधन करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले बोलले गेले.
डॉ. महेश यांना यशदीप वास्तु पुरस्काराने सन्मानित
