डॉ. राजेंद्र चांदोरकर ‘रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोअर’चे अध्यक्ष

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रोटरी क्लब ऑफ अलिबाग, वेगवेगळ्या सामाजिक, वैद्यकीय कार्यात नेहमीच सक्रिय सहभागी होत असते. क्लबचे मावळते अध्यक्ष डॉ. किरण नाबर यांच्या कारकिर्दीत बरेच समाजोपयोगी उपक्रम राबविले गेले. यंदाच्या 2021-22 या रोटरियन कालावधीसाठी क्लबचे अध्यक्ष म्हणुन आयएपी रायगड तसेच आयएमए अलिबागचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

डॉ. किरण नाबार यांनी नियोजित केलेल्या एका आभासी कार्यक्रमात रविवारी (दि.4) पदभार शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. डॉ. किरण नाबर यांच्याकडुन डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली. क्लबचे सचिव म्हणुन आनंद वालेकर तसेच कोषागारपदी निमिष परब यांनी पदभार स्वीकारला. दिलीपकुमार भड, अनघा साडवीलकर, डॉ. शिवपाल तिवारी, डॉ. विनायक पाटील, डॉ. पुनम नाईक, डॉ. अनिल डोंगरे, डॉ. दीपक गोसावी, डॉ. गिरीष कोळवणकर, डॉ. निलेश म्हात्रे तसेच डॉ. किरण नाबर यांची बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणुन वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती करण्यात आली.

ऑनलाईन/व्हर्चुअल प्लॅटफॉर्मवर झालेल्या या आभासी सोहळ्यास रोटरी सदस्य, रोट्रॅक्टर्स, त्यांचे कुटुंबीय, नॉन रोटरियन पाहुणे उपस्थित होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. दिपक पुरोहित, विष्णू म्हात्रे तसेच डॉ. दिपक खोत यांना निमंत्रित करण्यात आले होते.

इंडियन मेडिकल असोसिएशन, अलिबागच्या अध्यक्षपदावरून नुकतेच कार्यमुक्त झालेले रोटरी अलिबागचे नवनिर्वाचित अध्यक्ष बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर म्हणाले, आमच्या एक वर्षाच्या रोटरी कारकिर्दीत आम्ही शक्य होतील तितके सामाजिक उपक्रम राबवू. रोटरीचा समाजसेवेचा वसा असाच चालु ठेऊ. शहरात रोटरी क्लबचे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version