डॉ. शेखर धुमाळ यांना अटक

। पेण । प्रतिनिधी ।
महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याप्रकरणी जोहे येथील डॉ. शेखर धुमाळ यांना शुक्रवारी दादर सागरी पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. धुमाळ यांना न्यायालयात हजर केले असता 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पेण तालुक्यातील अनेक कारणास्तव सतत प्रसिद्धीच्या झोतात असणारे डॉ. शेखर धुमाळ यांच्याविरुद्ध महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, धुमाळ डॉक्टरांना अटक होणार नाही, अशा प्रकारच्या वावड्या उठल्या जात होत्या. त्यामुळे सर्वसामान्य पोलीस यंत्रणेकडे संशयाने पाहात होते. परंतु दादर सागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत. डॉ. शेखर धुमाळ यांना उशिरा अटक करुन न्यायालयात हजर केले असता 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली असून, या गुन्हामध्ये फिर्यादी महिलेचा नवरा रोशन अरुण कोळी आणि सासूला सुभद्रा (सुभा) अरुण कोळी यांनादेखील अटक केले आहे. एकूण पाच जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला असून, यातील दोन आरोपी देवता विनायक भोईर व विनायक भोईर यांचा शोध पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर भौड करत आहेत.

या अगोदर ही अशा प्रकारच्या घटना या दवाखान्यात झाल्याचे दबक्या आवाजात हमरापुर विभागात बोलले जात होते. परंतु तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे डॉ. आपला हा अनधिकृत धंदा इमानेइतबाराने करत होते. मात्र, वरेडी येथील पीडित महिलेने धाडस करुन डॉ. आणि तिच्या सासरच्या मंडळींन विरुध्द फिर्याद नोंदविली. यामध्ये कडनी स्टोन सूतिकाग्रह व अ‍ॅक्युपंक्चर सेंटर या दवाखान्यात डॉ. धुमाळ यांचेकडे नेउन वेळोवळी उपचाराद्वारे डॉ. धुमाळ मर्जीविरुध्द गर्भपात केल्याची फिर्याद दिली. तेव्हा डॉ. शेखर धुमाळ यांचा खरा चेहरा सर्वसामान्यांच्या समोर आला.
00000000000

Exit mobile version