| माणगाव | प्रतिनिधी |
माजी नगरसेवक हेमंत विष्णुदास शेट यांची कन्या डॉ. दिशा हेमंत शेट या नुकत्याच एमबीबीएस, एम.एस. (जनरल सर्जरी) उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी माणगाव नगरीतून तसेच गुजराती समाजातून पहिली महिला सर्जन डॉक्टर होण्याचा मान पटकाविला आहे. तिने सर्जन डॉक्टर पदवी मिळविल्याबद्दल तिचे माणगाव तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून विविध स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.




