मेडिकोज अध्यक्षपदी डॉ. तझीन राहटविलकर

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव मेडिकोजच्या अध्यक्षपदी अल्फा हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. तझीन इस्माईल राहटविलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गारळफाटा येथील हॉटेल आनंद भुवनच्या सभागृहात झालेल्या मेडिकोजच्या वार्षिक सभेत ही निवड झाली. निवडीनंतर उपस्थित डॉक्टरांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. तझीन राहटविलकर यांचे अभिनंदन केले.

माणगाव शहरातील मोर्बा रोडवरील खांदाड गावच्या हद्दीत असलेल्या अल्फा हॉस्पिटलचे डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते डॉ. इस्माईल राहटविलकर यांच्या त्या पत्नी आहेत. डॉ. तझीन राहटविलकर या रुग्णसेवेबरोबरच सामाजिक व शैक्षणिक कार्यातही सक्रिय आहेत. त्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या द.ग. तटकरे महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्या म्हणूनही कार्यरत आहेत. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. तझीन राहटविलकर यांनी मेडिकोजच्या सर्व सभासदांचे आभार मानले. मिळालेल्या संधीचे निश्चितच सोने करीन. सर्वांना सोबत घेऊन विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यावर भर देणार आहे. जनसेवा आणि रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून माणगाव मेडिकोजचे कार्य जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. तझीन राहटविलकर यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version