। चिपळूण । वार्ताहर ।
सामाजिक कार्यात नावलौकिक प्राप्त,प्रसिद्दीपासून दूर असणारे विनोद मोरे यांना दिल्ली येथील डॉ अब्दुल कलाम फाऊंडेशन तर्फे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सदभावना पुरस्कार देण्यात आला.कोरोनाच्या कालावधीत हा कार्यक्रम न झाल्याने मोरे यांच्या महाड येथील फाऊंटन इन हॉटेलमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोटरी क्लब मुंबईचे प्रमुख हरजित सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी देशदूत दैनिकचे रामेश्वर सारडा आदी मान्यवर उपस्थित होते.





