रायगड जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघाची प्रारूप मतदार यादी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्रावर, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आदी ठिकाणी 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्व मतदारसंघात युवा, महिला दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली. प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांच्या हस्ते सर्व राजकीय पक्षांना प्रारूप मतदार यादीचे वितरण करण्यात आले. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते.

6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत दावे व हरकती नोंदविण्यात येतील. तसेच ते 29 ऑगस्ट पर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच अंतिम मतदार यादी 30 ऑगस्टला प्रसिद्ध होणार असल्याचेही जावळे यांनी यावेळी सांगितले. दुरुस्तीसाठी विशेष शिबिर 10 व 11 ऑगस्ट तसेच 17 व 18 ऑगस्ट रोजी आयोजीत करण्यात आले आहे.

Exit mobile version